शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा; विरोधक आक्रमक

Foto
शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्यांचा सातबारा कोरा करावा आणि अतिवृष्टीमुळे नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकर्‍यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य करावं, या मागण्यांवरून विरोधकांनी आज विधानसभा आणि विधानसभा परिसर दणाणून सोडला. विरोधकांनी विधानसभेच्या पायर्‍यासमोरच जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे ठाकरे सरकारला हे अधिवेशन जड जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानसभेच्या पायर्‍यावर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी दिलीच पाहिजे, सरकारची फसवणूक करणार्‍या सरकारचा निषेध असो आणि शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसणार्‍या सरकारचा निषेध असो, अशा घोषणाही विरोधकांनी यावेळी दिल्या. विधानसभेच्या पायर्‍यावर विरोधकांनी सुरू केलेल्या या धरणे आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून गदारोळ सुरू केला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker