एमआयएमचे वारीस पठाण यांचे वादग्रस्त वक्‍तव्य...

Foto
औरंगाबाद : एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत केलेल्या वक्‍तव्यामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून या त्यांच्या वक्‍तव्याचा आम्ही निषेध करतो, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील मुस्लिम समाजातील अनेक मान्यवरांनी व्यक्‍त केली आहे.
पठाण  वर  कारवाई  करा
भारताची गंगा जमनी संस्कृतीला कोठे तरी कलंक लावण्याचं हा  प्रकार आहे. एमआयएम पक्ष  प्रमुख ओवेसी नेहमी आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत  याचा आव आणतात मात्र त्यांच्या नेत्यांचे हे  वक्तव्य अशोभनीय आहे. भारतात  सत्तर  टक्के आहे. समाज धरनिरपेक्ष आहे. हे  दिल्ली  विधानसभेच्या  निकाला वरून स्पष्ट  होते. अश्या  लोकांवर  कडक  कायदेशीर  कररवाई  होणे  गरजेचे  असल्याचे माजी शहर काँग्रेस अध्यक्ष इब्राहीम पठाण यांनी म्हटले आहे.
एमआयएम मुळात  वादग्रस्त
एमआयएम हा राजकीय  फायद्यासाठी  हिंदू - वाद उकरून काढणारा  पक्ष  आहे.पक्षाचे नेते  भाजपची दलाली करणारे आहे. हे मुस्लिम  समाजाचे  हितचिंतक नव्हे तर दुश्मन आहे. आता मुस्लिम  समाजाने यांच्या असली  चेहरा समजून घेतला आहे. भविष्यात  महाराष्ट्रातून हा पक्ष लवकरच  तडीपार  होईल. बेताल वक्तव्य  करणार्‍यावर  कडक  कादेशीर  कार्रवाई करण्यात यावी, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केली.    
                      धर्मनिरपेक्ष  समाजाला  घातक वक्तव्य
आपला  देश  हा धर्मनिरपेक्ष आहे.देशाच्या एकता अखंडतेला न शोभणारे वक्तव्य अस्वीकार्य  आहे. इस्लाम धर्मात इतर समाजाला  दुखविण्याला अजिबात पोहोचविणारे    स्थान नाही. जर  कोणाला पटत नसेल  तर  त्यांने खुशाल  ठरवावे  मात्र  पूर्ण  मुस्लिम समाज यात भरडला जाईल  असे बेताल  वक्तव्य  करू  नये. आपली विचारसरणी कोणावर  अजिबात थोपविण्याचा प्रयत्न करू नका. या  मूळे पूर्ण समाज बदनाम होतो. पठाण  यांचे वक्तव्य मुस्लिम समाजाला नुकसान  पोहोचविणारे असल्याचे मत मुस्लिम  विद्वान -  जमात  ए  इस्लामी  हिंदचे सलीम  सिद्दीकी यांनी व्यक्‍त केले आहे.

ओवेसींनी  दिली तंबी
 वारीस पठाण  यांच्या  वादग्रस्त  वक्तव्या वरून  पक्षाध्यक्ष  बॅरिस्टर असदुद्दीन  ओवेसी यांनी त्यांचे  कान उपटले आहे.  खबरदार  जर असले वक्तव्य भविष्यात  केले  तर, नसता पक्षातून  काढून  टाकण्यात  येईल अशी तंबीही त्यांनी  दिली आहे.  

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker