तिच्या प्रेमासाठी तो दोन वर्षांपासून करतोय सेवाशुश्रुता

Foto
एका जेष्ठ पत्रकाराची अनोखी प्रेमकहाणी 
अगदी साधी पण तितकाच मनाचा ठाव घेणारी एक सुंदर  प्रेमकथा ८० च्या दशकात फुलली. प्रविण व मंगला बर्दापूरकर यांची आगळीवेगळी प्रेमकथा तर आहेच ; त्यासोबतच आजच्या तरुणाईला प्रेरणादायी अशी हि प्रेमकथा आहे. कुठल्याही नाट्यमय घडामोडी, फिल्मी ड्रामा यांच्या कथेत नव्हता. परस्परांवर असलेला विश्वास हा त्यांचा नात्यातील प्रेमापेक्षाही महत्त्वाचा दुवा असल्याचे दिसून येते. प्रवीण आणि मंगला बर्दापूरकर यांची हि प्रेमकहाणी त्यांच्याच शब्दात. 

 चिपळूणच्या सागर दैनिकात काम करत असतांना नागपूरच्या नागपूर पत्रिका या दैनिकासाठी मी  लिखान करीत असे. माझ्या त्या लिखाणाच्या त्याही पेक्षा अधिक माझ्या हस्ताक्षराच्या मंगला प्रेमात  होती.  नागपूर पत्रिका या दैनिकात रविवार पुरवणी साठी मंगलला  असिस्ट करायला मला सांगितले गेले. येथूनच आमच्यात जवळीक निर्माण झाली.पत्रकारितेचा कैफ चढलेल्या माझ्या मनात प्रेमाचा वा लग्नाचा विचारही  नव्हता. मंगलला इम्प्रेस करण्यासाठी मी अक्षरांकनाच्या वेगवेगळ्या शैलीत  सुंदर अशा अक्षरात निरोप लिहून ठेवत असे. कविता, वाचन, जुनी गाणी, एकुणच मराठी साहित्य याविषयी आमच्या तारा एकमेकांशी जुळत गेल्या.
मंगलचे इंग्रजीवर प्रभुत्व, अतिशय हुशार, मराठीत त्यावेळी ती पीएचडी  करत होती. घरची सांपत्तिक परिस्थिती देखील चांगली होती. तर एकीकडे मी असा फाटका, घराशी तुटलेली नाळ, जवळ जास्त कुठलीही संपत्ती, वस्तू नाही.तरीहि  हळुहळू आमच्यातील नाते बहरत होते. त्यावेळचे नागपूर पत्रिकेचे व्यवस्थापक नरेश गद्रे यांनी कार्यालयात मंगला व प्रवीण हे लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे घोषित केले . व आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मंगलाच्या घरून जास्त विरोध नव्हताच. मंगलाची आई मालती विंचुर्णे ज्यांना आम्ही ताई म्हणायचो , ताईंना माझे लिखाण  आवडत असे. हा मुलगा नक्कीच आयुष्यात काहितरी खूप मोठे करुन दाखवेल असा विश्वास त्यांना होता.अशाप्रकारे ११ फेब्रुवारी १९८४ ला आम्ही नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यावेळी अनेक लोक म्हणत असे, कि प्रवीण फार हट्टी आहे, परंतु त्याचवेळी मंगला त्यांना म्हणत असे, तो हट्टी नाहीये, अचूकतेसाठी त्याचा आग्रह आहे. प्रत्यक्ष संसार हा प्रेमकथेपेक्षा वेगळा असतो, अनेकांना अनेक तडजोडी कराव्या लागतात.मंगलमुळे मला शब्द समजत गेले.एखाद्या माणसाला त्याच एकंदरीत जगण  आणि व्यावसायिक आयुष्य अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी जे काही पूरक हव असत ते मला मंगलाच्या सहवासामुळे  मिळाले. मंगलाचा माझ्यावर असलेला विश्वास मला पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारा होता. मध्यंतरी मी नागपूर पत्रिका दैनिक सोडले. एकाचवेळी मी अनेक दैनिक व साप्ताहिकांसाठी काम करीत असे.दिवसातले २४ तास मला कमी पडत असे. त्यावेळी घरातल्या सगळ्या गोष्टी मंगलाने अगदी व्यवस्थित सांभाळल्या.
पुढे औरंगाबादला आल्यानंतर माझा पत्रकारितेचा वाढलेला व्याप पाहता मंगलने नोकरी सोडून पूर्णवेळ घरासाठी द्यायचे ठरवले. लोकसत्ता सारख्या दैनिकात काम करतांना मला मिळालेल्या नावलौकिकाचे श्रेय हे माझ्या इतकेच मंगलाला सुद्धा आहे . आमच्या ३५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात कधीच भांडणे, मतभेद झालेच नाहीत असे म्हणणार नाही तर परस्परांवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर आजही आम्ही दोघे एकमेकांसोबत आहोत. संसार कसा करायचा असतो हि बाजू मला मंगल आजारी पडल्यानंतर समजली. एका गृहिणीचे काम हे किती थकवणारे असते हे यानिमित्ताने मला कळाले. मंगलने गेली ३३ वर्षे हे ज्या पद्धतीने सांभाळले ते महत्वाचे ठरते. 

गेली दोन वर्षे मंगला बर्दापूरकर अंथरूणाला खिळून आहे. त्यांची सर्व देखभाल करण्याचे काम प्रविण स्वत: करतात. एका गृहिणीचे काम हे अतिशय अवघड असते, असेही ते म्हणाले. लग्न हे एका क्षणी होऊन जाते, परंतु परस्परांवरील विश्वास हा हळुहळू वृद्धिंगत करायचा असतो.तडजोड हे यशस्वी विवाहाचे पॅरामीटर नाही. आजार, दु:खांच्या प्रसंगी तुम्ही एकमेकांना कसे सांभाळतात हिच प्रेम विवाहाची फलश्रुती असल्याचे प्रविण म्हणाले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker