घाटीतील जीवनधारा मेडिकलला ठोकले सील

Foto
औरंगाबाद :-  महाराष्ट्र कझुमर फेडरेशनने गेले सहा महिन्यांपासून जनऔषधी केंद्र सुरू न केल्याने आज सकाळी घाटीतील जीवनधारा मेडिकलला सील ठोकले.

महाराष्ट्र कंझुमर फेडरेशनला ० ते ५ टक्के दरात सवलत देऊन औषधी दुकान चालविण्यासाठी जागा दिली होती. तो करार एप्रिलअखेर संपला. मात्र जून २०१८ ला १० ते ६० टक्के औषधी किंमतीवर सवलत देण्यासाठी जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी डीएमईआरने संस्था निवडल्या. घाटीतील जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र कंज्यूमर फेडरेशनशी करार झाला. हे केंद्र ऑगस्ट २०१८ पर्यत सुरू होणे अपेक्षित असताना जुने जीवनधारा मेडिकल फेडरेशन ने बंद न केल्याने जनऔषधी केंद्र सुरू केले नाही. दरम्यान दंत महाविद्यालयातील मंजूर जनऔषधी केंद्र घाटीच्या ओपीडिसमोर सुरू करण्याचा घाट घालण्यात आला. परवानगी नसताना हे जनऔषधी केंद्र ११ ते १२ फेब्रुवारी दरम्यान असे दोन दिवस सुरू झाले. ३४ तासात वादग्रस्त केंद्रावर हरकती नोंदविण्यात आल्या. हे केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर एमआयएमने पत्रकार परिषद घेऊन घाटी प्रशासनाने पाच पट जागा देत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.त्यानंतर घाटी प्रशासन खडबडून जागे होत जनऔषधी केंद्र व जीवनधारा केंद्राला जागा खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या. जागा खाली न केल्याने वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुरेश हरबडे, डॉ.विकास राठोड यांनी सकाळी मेडिकल सील केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker