ईव्हीएम विरोधात एकवटणार्‍यांना आत्मचिंतनाची गरज-मुख्यमंत्री

Foto

मुंबई : ईव्हीएम मशीनमुळे भाजपाचा विजय झाला. ईव्हीएम मध्ये घोळ आहे, असे म्हणत गळे काढणार्‍यांना आणि याविरोधात एकवटणार्‍यांना आत्मचिंतनाची गरज आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. वर्धा या ठिकाणी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपला पराभव का झाला? लोकांनी आपल्याला का नाकारले? याचा विचार करा असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत. आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी होते आहे. 
याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ईव्हीएमला विरोध करणार्‍यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.