लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; सुरुवातीला बॅलेट मताची मोजणी

Foto
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला बॅलेट मताची मोजणी होणार असून यानानंतर ईव्हीएम मतांची मोजणी सुरु होणार आहे. यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी होणार आहे. 

 देशभरात ५४३ पैकी ५४२ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. एका मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली होती. ५४२ मतदार संघातील मतमोजणी एकाच वेळी सकाळी आठ वाजता सुरु झाली असून थोड्याच वेळात मतमोजणीचे कल समोर येण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्रातील अनेक लढती लक्षवेधी ठरल्या असून बारामती, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, अहमदनगर येथील लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. आता, या मतदारसंघात कोण बाजी मारणार याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker