जिकठाण फाट्यावर कार अपघातात डॉक्टरचा मृत्यू

Foto

औरंगाबाद : चारचाकी कार चा अपघात होऊन एका डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला तर शेजारील सीटवर बसलेला एक जण गंभीर जखमी झाला ही घटना मध्यरात्री १२ च्या सुमारास औरंगाबाद पुणे महामार्गावरील जिकठण फाटा येथे घडली.

डॉ अमोल वावरे असे मृत डॉक्टरांचे नाव आहे तर मुकुंद पाठे असे जखमी चे नाव आहे.पाठे हे मनसेचे पदाधिकारी आहेत.मृत  डॉ.अमोल वावरे हे त्यांच्या कार मधून गंगापूर कडे जात असताना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास जिकठण फाट्याजावळील वीस नंबर खोली जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला या अपघातात वावरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमी पाठे याना रुग्णालयात हलविले त्यांच्यावर घाटी रिग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker