सचिन ते विराट अन् शोले ते डीडीएलजे;याचा उल्लेख करून ट्रम्पनी आपुलकीने मने जिंकली.

Foto
अहमदाबाद :-  भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुपारी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर उपस्थितांना  संबोधित केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील विविधतेत एकतेचा उल्लेख केला. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली या क्रिकेटपटूंसह बॉलिवूड आणि शोले, डीडीएलजे या सुप्रसिद्ध चित्रपटांचा उल्लेख करून उपस्थितांची आपुलकीने मने जिंकली. 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आज तुम्ही जे प्रेम आणि आदरातिथ्य दाखवले ते आमच्या मनात कायम राहील. हे मोटेरा स्टेडियम खूप सुंदर आहे. येथील बॉलिवूडची जगभरात ओळख आहे. तसेच   दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि शोलेसारख्या चित्रपटांचा आस्वाद जगभरातील अनेक लोकांनी घेतला आहे.''असे ट्रम्प यांनी सांगितले.
 'काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी ह्युस्टन येथे आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत हाऊडी मोदी कार्यक्रमात फुटबॉल स्डेडियमवर करण्यात आले होते. आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्डेडियम असलेल्या मोटेरावर माझे स्वागत करण्यात आले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंची ओळख जगभरात आहे.'' असे ट्रम्प म्हणाले. 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात दिवाळी आणि होळी या सणांचाही उल्लेख केला. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच भारतातील विविधतेमधील एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker