जोरदार शक्तिप्रदर्शन करत खा. रावसाहेब दानवे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Foto
जालना लोकसभा मतदारसंघात खासदार रावसाहेब दानवे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत आज भाजप प्रदेशाध्यक्ष तथा जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहेत. तत्पूर्वी त्यांच्या पत्नी सौ निर्मला दानवे यांनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पुत्र आमदार संतोष दानवे उपस्थित होते. 

जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन प्रदेशाध्यक्षमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास केशवराव औताडे यांनी कोणतीही शक्ती प्रदर्शन न साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र याउलट खा. रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात आपले जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी जमवली आहे. आज सकाळी आपल्या पत्नीकडून औक्षण केल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या मूळ गावी जवखेडा येथे जाऊन ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेतले. मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन नंतर मामा चौकात आपली हजेरी लावली. त्यानंतर रावसाहेब दानवे हे जालना शहरात दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचेही या ठिकाणी आगमन झाले आहे. जालना ते मामा चौकातून भव्य समर्थकांसह या रॅलीचा प्रारंभ झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत.

जालना शहरांमध्ये पूर्ण भाजपमय आणि महायुतीचे वातावरण झाले असून आपले शक्तीप्रदर्शन करण्यात खासदार रावसाहेब दानवे यांनी कोणतीही कसर सोडलेली नाहीये. या भव्य उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीमध्ये महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या शक्ती प्रदर्शनामुळे खासदार रावसाहेब दानवे यांनी आपली सर्व शक्ती आज पणाला लावली आहे.