ईव्हीएम विरोधात विरोधकांचा एल्गार..! २१ ऑगस्टला सर्वपक्षीय आंदोलन

Foto

मुंबई: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट विरोधाचा सूर आणखी तीव्र करत सर्व विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद मुबंईत हॊत आहे. यामध्ये ईव्हीएम वर जनतेचा विश्वास राहिला नसून निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याचा आमचा आग्रह आहे. यासाठी २१ ऑगष्ट रोजी मुबंईत ईव्हीएम विरोधात आंदोलन होणार असून यामध्ये सर्व विरोधी पक्षातील नेते सहभागी होणार आहेत. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

ईव्हीएम विरोधातील आंदोलनात भाजपा आणि शिवसेना यांनीही सहभागी व्हायला पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  स्वाभिमानीचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि छगन भुजबळ यांची या पत्रकार परिषदेला हजेरी होती. राज ठाकरे आणि अजित पवार हे शेजारी शेजारीच बसलेले होते. सर्व पक्षांनी एकमुखाने ही मागणी केली आहे.

ईव्हीएमला विरोध करण्यासाठीच आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला हवी ही आमची नाही तर जनतेची भावना आहे ती आम्ही मांडतो आहोत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जपान, नेदरलँड आणि अमेरिकेत या तीन देशांमध्येच ईव्हीएमची चीप तयार होते. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निवडीवरच प्रश्न निर्माण झाला आहे अशात आम्ही त्याच देशात आमच्या देशातल्या ईव्हीएमची चीप आणली जाते तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.  ३७१ मतदारसंघांमध्ये घोळ आहे, ५४ लाख मतांचा गोंधळ आहे असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker