माजी आ. अरविंद चव्हाणांची घरवापसी; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Foto
  
जालना: भाजपचे नेते व माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विधान पाररिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, प्रवक्ते नवाब मलिक आदी नेत्यांची उपस्थिती होती. 

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक देखील त्यांनी भाजपकडून लढवली होती. मात्र, शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मागील अनेक दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घरवापसी केली आहे.