मैं सबका बाप हूँ, सबको गिराता हूँ ; खा. रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली ; विरोधकांना गर्भित इशारा

Foto
आपल्या वादग्रस्त वक्‍तव्यामुळे नेहमी अडचणीत येणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात वादग्रस्त वक्‍तव्य केल्याचे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यांनी विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या विरुद्ध सर्व चोरटे एकत्र येत असल्याचा उल्‍लेख केला आहे. तसेच मी तुम्हाला पैसे देतो त्यांना देत नाही. त्यामुळे सर्व चोर एकत्र आले असल्याचे वादग्रस्त विधानही खा. दानवे यांनी केले. तुम्ही सर्व बुथ बांधण्याचे काम करा. “ मै सबका बाप हूँ मै सबको गिराता हूँ” असेही वक्‍तव्य केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी अडचणीत येणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले आहे. रावसाहेब दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच चोर असा केला आहे. त्यांची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जालन्यात प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी तुम्ही माझ्या मागे उभे राहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले असेही वक्तव्य केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये रावसाहेब दानवे उपस्थितांनी विचारताना दिसत आहेत की, मोदींना पंतप्रधान करणार का ?.पुढे ते म्हणतात की, ‘कोणी काहीही म्हणो काहीही सांगो, देशातले सगळे चोट्टे एक झाले आहेत आणि मोदींना होऊ नका सांगू लागले आहेत.

आपल्याकडेही सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडू असे म्हणू लागलेत. का तर मी मोदींजीचा माणूस आहे’. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. ‘रावसाहेब दानवे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत हेच कळत नाही. रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आहे. आपण काय बोलावे याचं भान असले पाहिजे. शेतकर्‍यांसाठी चुकीची भाषा वापरुनही पक्षाकडून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नव्हती. या निवडणुकीत आम्ही त्यांना उत्तर देऊ’, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

‘शेतकरी रडतात साले’
रावसाहेब दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दोन वर्षांपूर्वी तूर खरेदीवरून शेतकर्‍यांना ”साले”संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकर्‍यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफैर टीका झाली होती. जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात  बोलतान दानवेंनी हे वक्तव्य केले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने, तूर खरेदीबाबत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल केला. या अनपेक्षित प्रश्नाने दानवेंचा पारा चढला होता. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा,” अशी मुक्ताफळे दानवे यांनी उधळली होती.