दोन दिवसात जायकवाडीत पाण्याची पाणीपातळी ३ टक्यांनी वाढली; लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधान

Foto

पैठण : औरंगाबाद, जालना शहरासह मराठवाड्याची तहान भागवणार्‍या पैठण येथील जायकवाडी धरणात गेल्या दोन दिवसापासून पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात 25 हजार 545 क्युसेक पाण्याची आवक चालू आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत धरणाच्या पाणीपातळीत 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी नांदूर-मधमेश्‍वर प्रकल्पात पोहोचल्यानंतर ते गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असून, हे पाणी काल (रविवार) पासून जायकवाडी धरणात दाखल होत आहे. यामुळे जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्‍त केले जात आहे. 

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार्‍या नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्‍वर पिकअप वेअरमधून 24 हजार 545 क्युसेक गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. 

गोदावरी नदीपात्रात सोडलेले हे पाणी शनिवारी मध्यरात्रीपासून जायकवाडी धरणात 24 हजार 545 क्युसेकने दाखल होत आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत धरणाच्या पाणी पातळीत 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणाच्या जलसाठ्यात 2.25 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. आज दुपारी 12 वाजता धरणात 1490.49 फूट (454.301 मीटर) इतकी पाणीपातळी होती. 

आज दुपारी 12.00 वाजेपर्यंतची स्थिती
जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी : 1490.49 फूट
जायकवाडी धरणाची पाणी पातळी : 454.301मी.
आवक : 24545 क्युसेक
एकूण पाणी साठा : 574.151 दलघमी
जीवंत पाणी साठा : (-)163.955 दलघमी
धरणाची टक्केवारी : (-)7.55 %

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker