भाजपमध्ये मेगाभरती..! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

Foto
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर आहेत.

 आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये येण्यासाठी तयार असलेल्या कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार आहेत. 

आम्हाला वाट दाखवणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. यापुढे आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करायचं आहे आणि त्याचमुळे माझ्यासहीत या सगळ्यांनीच भाजपात प्रवेश केला आहे असे मधुकर पिचड यांनी म्हटले आहे. आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगलं काम करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करायची आहे असंही पिचड यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हटले? 
महाराष्ट्रातल्या आपल्या कारकिर्दीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असे दिग्गज लोक भाजपाच्या परिवारात आले याचा मनस्वी आनंद होतो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ अनुभव असलेले मधुकर पिचड भाजपात आले हे महत्त्वाचे आहे. त्यांची एखादा विषय हाताळण्याची हातोटी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातल्या आदिवसी समाजात जे नेतृत्त्व मानलं जातं असे मधुकर पिचड आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker