प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या जालन्यात

Foto

औरंगाबाद:-  भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालना शहरात येत आहेत. उद्या  18 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांची आझाद मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जालना लोकसभा मतदार संघातून भाजपा-शिवसेना-रिपाइं युतीकडून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ उद्या सायंकाळी आझाद मैदानात प्रचंड सभा आयोजित केली आहे. या सभेला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, आ. संदिपान भुमरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, आ. संतोष सांबरे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे, माजी आमदार विलास खरात, सांडू पाटील लोखंडे, राजेश राऊत, जिजाबाई जाधव, सविता किवंडे, भाऊसाहेब घुगे, लक्ष्मणराव दानवे, अशोक पांगरकर, देविदास देशमुख, आतिक खान, आयेशा खान, बाबासाहेब भोजने, गणेश रत्नपारखे आदी उपस्थित राहणार आहेत