टँकरने जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार

Foto
वैजापूर :  रोटेगावहून वैजापूरकडे जाणाऱ्या टी व्ही एस लुना मोटारसायकला पाठीमागून येणाऱ्या मळीच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर दोघे जखमी जखमींमध्ये एक सहा वर्षाची चिमुकली गंभीर जखमी समावेश आहे व 57 वर्षीय लुना मोटारसायकला स्वार जखमी या बाबत मिळालेली माहिती अशी की दि. 22 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास रोटेगावहून वैजापूरकडे जाणाऱ्या टी व्ही एस लुना क्रमांक एम एच 20 ई एम 6730 ला पाठीमागून भरधाव येणाऱ्या मळीच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने लुना मोटारसायकला वरील गयाबाई भाऊसाहेब शिंदे वय 65 वर्षे रा रोटेगाव ही महिला जागीच ठार झाली असून लुना चालक बाळनाथ राऊसाहेब शिंदे रा वय 56 वर्षे व पायल शंकर शिंदे वय 6 वर्षे हे दोघेही गंभीर जखमी झाले  असून यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पायल शंकर शिंदे हिच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.    
 अपघातानंतर टँकर चालक जागेवर न थांबता  भरधाव वेगाने पळून जात असताना त्याचा पाठलाग करून नागरिकांनी आंबेडकर चौकात गाडी थांबवून चालकास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले  नागरिकांनी 108 या आपत्कालीन नंबर वर फोन करून सुद्धा वेळेवर गाडी उपलब्ध झाली नाही त्यामुळे जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात उशिरा झाल्याने नागरिक उपजिल्हा रुग्णालयात गेले असता  108 गाड्या उपजिल्हा रुग्णालयात आवारात आढळून आल्या याबद्दल नागरिकांमध्ये रोश निर्माण होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker