मतदारांपुढे जोडलेले दोन हातच मला निवडून आणतील - अंबादास दानवे

Foto

औरंगाबाद: निवडणूक कुठलीही असली की पैसा हा आलाच. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वारेमाप पैशांचा वापर झाल्याचे आपण नेहमी पाहतो. सध्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एसबी काॅलेजमध्ये युतीचा मेळावा झाला. यामध्ये भाजपा-सेना युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी मतदारांपुढे जोडलेले दोन हातच मला निवडून आणतील. त्यामुळे जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही असे सांगितले. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. 

यानंतर माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी देखील अंबादास गरीब आहे. त्यामुळे कुणीही कसलीही अपेक्षा न ठेवता काम करा. असं आवाहन कार्यकर्ते व पदाधिकर्यांना केले. अंबादास आणि माझ्यात वाद असल्याचे अनेकदा सांगितले जाते. मात्र, त्यात तथ्य नसुन आम्ही दोघे वरून कसेही वागत असलो तरी आतून एक आहोत असे खैरे यावेळी म्हणाले.

उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात काहीही गैर नाही. मात्र, एकदा निर्णय झाल्यानंतर पक्षादेश सर्वोपरी माणून काम करायचे असते. आता, भाजप-सेना युती असल्याने अंबादास दानवे सहज निवडून येतील असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी खा.चंद्रकांत खैरे, जिल्हापरिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर  विजय औताडे, संपर्कप्रमुख विनोद घोसळकर, माजी आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय सिरसाठ, आ. प्रशांत बंब, आ. संतोष दानवे, शहरप्रमुख किशन तणवानी, गजानन बारवाल,  त्र्यबंक तुपे,  अनिरुद्ध खोतकर, मनिषा कांयंदे, शिरीष बोराळकर, भास्कर आंबेकर, सुहाश दाशरथे, कचरू घोडके, भागवत कराड, प्रमोद रोठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker