फोडाफोडीचे राजकारण: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामांच्या कोलांट उड्या

Foto
औरंगाबाद : विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या आहेत. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकता याव्यात यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या वतीने विरोधी पक्षातील आमदारांना गळाला लावण्यात येत आहे. सध्या देशात आणि राज्यात भाजपची लाट आहे. या लाटेत निवडून येता येणार नाही हे ओळखून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी विकासाच्या नावाखाली आपली सत्ता कायम राखण्यासाठी कोलांटउड्या सुरु केल्या आहेत.  या  आयाराम-गयारामांमुळे मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे बुरुज ढासळत चालले आहेत. 

लोकसभेच्या निवडणुका तीन महिन्यांपूर्वी झाल्या. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकसभा निवडणुकाप्रसंगी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्ष प्रवेश देऊन लोकसभेचे तिकीट दिले आणि निवडून आणले. लोकसभेनंतर आता ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात सेना-भाजपची युती असली तरी भाजपचे अनेक नेते मात्र स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. सध्या भाजपचे 122 आमदार निवडून आलेले आहेत. बहुमतांसाठी भाजपला 23 आमदारांची आवश्यकता आहे. बहुमताचा आकडा स्वबळावर पार करण्यासाठी सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेने काँग्रेस आघाडीला लक्ष केलेले आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. हे काँग्रेस आघाडीतील आमदार व नेते ओळखून आहेत. आपल्या राजकीय जीवनातील पाच वर्षे वाया जाऊ नयेत यासाठी काही सूज्ञ राजकीय नेत्यांनी सत्ताधारी सेना-भाजपात प्रवेशाची वाट धरली आहे. या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे.

चित्रा वाघ, सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर, मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्र राजे भोसले, आ. संदीप नाईक, मोहिते कुटुंब यांनी तर काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, आ. कालिदास कोळंबकर या दिग्गजांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेत प्रवेश केला आहे. यातील बहुतांश आमदारांनी मतदार संघाचा विकास करता यावा, जनतेचे प्रश्‍न सोडविता यावा, जनतेचे प्रश्‍न सोडविता यावेत यासाठी आपण प्रवेश करीत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आपली सत्ता कायम राहावी हाच मूळ उद्देश या पक्ष प्रवेशामागचा हेतू असल्याचे दिसते. कारण आणखी पाच वर्षे  काँग्रेस आघाडीचे सरकार येणे शक्य नाही. ज्या पक्षाने नाव, गाव ओळख दिली, आमदार, खासदार मंत्री केले अशी मंडळीच आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आमदारांना ‘ईडी’ व चौकशीची भीती दाखवून पक्ष प्रवेश केले जात असल्याचा आरोप केला. पण यापूर्वी शरद पवार यांनीही 1979 साली वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून सत्ता स्थापन केली होती. तसेच शिवसेनेचे छगन भुजबळ यांच्यासह 25 आमदार फोडून सत्ता टिकवली होती. त्याचीच परिणीती आज दिसून येत आहे. जे पेरले तेच उगवले असे बोलले जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker