कार्बाईडमध्ये पिकविलेल्या आंब्यांची सर्रास विक्री; अन्‍न व औषधी प्रशासन विभागाचे दुर्लक्ष !

Foto

औरंगाबाद : शहरामध्ये विविध ठिकाणी कार्बाईडमध्ये पिकविलेल्या आंब्यांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. यामुळे अनेकांचे आरोग्यही धोक्यात सापडू शकते. परंतु याकडे अन्‍न व औषधी प्रशासन विभागाकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी आले आहेत. औरंगपुरा, शहागंज, टीव्हीसेंटर, सेव्हन हिल, गजानन मंदिर परिसर, जाधवमंडी, उस्मानपुरासह इतर ठिकाणी विविध प्रकारचे आंबे आणण्यात आली आहेत. मात्र त्यात टीव्ही सेंटर, गजानन परिसर, जाधववाडी आदी भागांत कार्बाईडमध्ये पिकविलेले आंबे बाजारात सर्रासपणे विक्री होताना दिसत आहेत. याकडे अन्‍न व औषधी प्रशासन विभागानेही दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्वत:च काळजी घेऊन आंबे खरेदी करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker