लुटीचा बनाव आला अंगलट!

Foto

वैजापूर: बाबतरा येथील रोडवर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने मोबाईल टॅब व बँकेची कागदपत्रे लुटल्या. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पोलिसांनी अधिक तपास केला असता तक्रारदार लुटीचा बनाव करीत असल्याचे समोर आले आहे. अखेर फिर्यादीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अजय सुरेश शेलार (वय 20 वर्षे) हा क्रेडिट एक्सेस या खासगी फायनान्स कंपनीच्या वैजापूर शाखेत कर्मचारी म्हणून काम करीत होता. अजयने 23 मे रोजी लाडगाव येथे पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्याजवळील मोबाईल टॅब व बँकेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे बळजबरीने हिसकावून नेल्याची तक्रार दिली होती. याबाबत वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अजयच्या पाठीमागे ठेवलेल्या बॅगचा बंद तुटल्याने बॅगेतील कागदपत्र व मोबाईल गहाळ झाल्याचे त्याने सांगितले. याबाबत बँकेतील अधिकारी रागावतील व नोकरीवरून काढून टाकतील, या भीतीने अशी माहिती पोलिसांना दिली असल्याची कबुली अजयने दिली आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker