बारामतीत सुप्रिया सुळे यांनी गड राखला; १ लाख ५४ हजार मतांनी विजयी

Foto


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा परंपरागत मतदारसंघ असलेला बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला आहे. . भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी कडवे आव्हान दिल्याने चुरशीच्या आणि चर्चेच्या ठरलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार व शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांचा १ लाख ५४ हजार पराभव केला आहे. . बारामतीमध्ये सुळे यांना तब्बल 45,500 एवढे मताधिक्य मिळाले आहे, तर कांचन कुल यांना खडकवासला व पुरंदरमध्ये आघाडी मिळाली आहे. कांचन या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. भाजपने सुरुवातीपासूनच जोरदार प्रचार करत बारामतीमध्ये हवा निर्माण केली होती. भाजपच्या जोरदार प्रचारामुळे शरद पवारही अस्वस्थ झाले होते. इव्हीएमवर संशय उपस्थित करून त्यांनी या अस्वस्थतेचा पुरावाही दिला होता. मात्र, अखेर सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आह

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker