सुरत अग्‍नितांडव: मृतांची संख्या 20 वर !

Foto

 सुरत:  सुरतमधील सरथाणा परिसरात असलेल्या तक्षशीला इमारतीला काल सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या 20  वर पोहोचली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कोचिंग क्लासेसच्या दोन संचालकांना अटक केली आहे.शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तक्षशीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली होती. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत होता. आग लागल्यानंतर क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला आणि बाहेर निघायला कुठलाही मार्ग नसल्याने जीव वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्‍क चौथ्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker