पतंग उडवायला गेलेल्या सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Foto

वैजापूर- संक्रातीनिमित्त गच्चीवर पतंग उडवणे सात वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले आहे . पतंग उडवतांना वैजापूर येथील  भाटीया गल्ली भागात चार मजली इमारतीच्या गच्चीवरुन पडल्यानेया मुलाचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

 

 

लक्ष नरेंद्र संपत असे मृत मुलाचे  नाव असूनरविवारी सुट्टी असल्याने लक्ष पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडला. पतंग खेळता खेळता तो भाटीया गल्ली येथील चार मजली महाजन वाडी इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेला. पतंग खेळण्याच्या नादात चौथ्या मजल्यावरून लक्ष खाली पडल्याने त्यास गंभीर अवस्थेत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यास औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. घाटी येथील डॉक्टरांनी त्यास तपासुन मृत घोषित केले. लक्ष हा वैजापूर एसटी आगारातील नरेंद्र संपत यांचा मुलगा होता. तो सेंट मोनिका शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker