आज फक्त "ठाकरे"च ; चाहते करणार जल्लोषात स्वागत ; अनेक चित्रपटगृह हाऊसफुल्ल

Foto
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च झाला असला तरी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रुपरी पडद्यावर बाळासाहेबांची व्यक्तिरेखा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने यांनी साकारली असून साक्षात बाळासाहेब समोर उभे असल्याची जाणीव प्रत्येकाला होते. एव्हढा हा चित्रपट ताकदीचा बनला आहे. आणि त्याचा ट्रेलर तेवढाच दमदार असल्याने एक वेगळी ऊर्जा पाहणाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. आज हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये प्रदर्शित होत असल्याने, चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे हे विशेष. बाबाळासाहेबांवर नितांत प्रेम करणारे चाहते आज त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे जल्लोषात स्वागत करत आहेत. त्यामुळे अनेक चित्रपटगृहाच्या बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहे. शिवसैनिक आणि मनसैनिकांनी या चित्रपटाचे संपूर्ण खेळ अगोदरच बुक केले आहेत. त्यामुळे एक धगधगती ऊर्जा प्रत्येकामंध्ये निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

जगभरात केवळ शिवसैनिकच बाळासाहेबांचे चाहते नसून अनेक क्षेत्रातील दिग्गज तसेच सर्वसामान्य व्यक्तीही त्यांचे चाहते आहे. चित्रपक्तदाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने बाळासाहेबांच्या प्रत्येक आठवणी जाग्या केल्या आहेत. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खासदार संजय राऊत यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली असून अभिजित पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. “ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आज फक्त “ठाकरे”च
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असतानाच आता नवा वाद निर्माण झाला होता. त्यातच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात काही कारणामुळे मुंबईत ठिणगी उडाली होती.  चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून अन्य चित्रपट निर्मात्यांना इशारा दिला आहे. २५ जानेवारीला ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा बाळा लोकरे यांनी दिला होता. त्यामुळे इतर चित्रपटांना आपल्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker