बेशिस्त मनपाचा नाकर्तेपण; शिवरायांना माल्यार्पणासाठी सावेंना करावी लागली कसरत

Foto

औरंगाबाद: महानगरपालिका आपल्या ढिसाळ नियोजनाकरिता सर्वत्र परिचित आहे. मनपाच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका आज भाजपचे आमदार व नुकतेच राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागलेले अतुल सावे यांना बसला.
मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यमंत्री अतुल सावे यांचे आज  सकाळी शहरात आगमन झाले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सावे यांचे नगर नाका येथून रॅलीने क्रांती चौकात आगमन झाले. ते क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व त्यानंतर भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने अभिवादन करण्याकरिता व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, तशी कोणतीही व्यवस्था मनपा प्रशासनाने केली नसल्याचे आज दिसून आले. 

राज्यमंत्री सावे हे क्रांती चौक येथे दाखल झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनाकरिता शिडी आणण्यात आली. तोपर्यंत सावे यांना ताटकळत बसावे लागले. त्यानंतरदेखील शिडी लावलेले ठिकाण व सर्कल यामध्ये पाणी साचलेले असल्याने सावे यांना अखेर गुडघ्यापर्यंत आपली पॅन्ट फोल्ड करून, समर्थकांच्या मदतीने शिडीपर्यंत जावे लागले. मनपा प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात आली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker