मराठवाड्यात लवकरच कृत्रिम पावसाचा प्रयोग - बबनराव लोणीकर

Foto
जालना : पावसाने ओढ दिलेल्या मराठवाड्यासाठी खुशखबर आहे. येत्या ३० जुलै पर्यन्त मरठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी राज्य सरकाने पूर्ण केली असल्याची माहिती  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना येथे दिली. 
 
 मराठवाड्यात झालेल्या कमी पावसामुळे सर्वांच्याच चिंता वाढल्या आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दिशेने हालचाली सुरु झाल्या आहेत. कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी राज्य सरकारने अर्ज सादर केला आहे. लवकरच या परवानग्या मिळणार आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद विमानतळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याप्रमाणेच रडार यंत्रणेचीही  परवानगी घ्यावी लागणार आहे. 

यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग कधी ..? 
राज्यात २००३ साली  तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने कृत्रिम  प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी 'पायपर शाईन' या विमानातून पावसाची बीजे ढगांमध्ये फवारण्यात आली होती. त्यानंतर २०१५  कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker