का झाला विवेक ओबेरॉय सोशल मीडियावर ट्रोल..?

Foto

नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावरील चित्रपटात मोदींची भुमिका साकारणारा सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय हल्ली भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्यांच झालं असं, टीव्हीवर दाखवल्या जाणार्या ओपीनियन आणि एक्झीट पोलवर टीका करताना त्याने ऐश्वर्या राय हिचे तिन वेगवेगळे फोटो ट्विट केलेत. ज्यामुळे तो सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल होत आहे.

विवेकने शेअर केलेल्या ट्विटमधील पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत आहे. तर दुसर्या फोटोत खुद्द विवेक ओबेरॉय सोबत आहे तर तिसर्या फोटोत ती तिची मुलगी आराध्या व पती अभिषेक बच्चन सोबत आहे. या तिन फोटोंना  त्याने अनुक्रमे ओपीनियन, एक्झीट आणि अंतिम निकाल असे वेगवेगळे कॅप्शन दिले आहेत. त्याच्या या ट्विटमुळे सोशल मिडीयावर विवेक प्रचंड ट्रोल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर विवेकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दाखल घ्यावी अशी देखील मागणी केली आहे.