येडियुरप्पांनी जिंकला विश्‍वासदर्शक ठराव

Foto
बेंगळुरू : कर्नाटकातील बी. एस. येडियुरप्पा सरकारने आज (सोमवारी) विधानसभेत आवाजी मतदानाने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे आता कर्नाटकातील सत्ता भाजपच्या हाती आली आहे.  

दरम्यान, येडियुरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी  आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस-जेडीएस सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर शुक्रवारी राजभवनातील सोहळ्यात राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. येडियुरप्पांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. अखेर या शक्‍तिपरीक्षेत येडियुरप्पा उत्तीर्ण झाले. त्यांनी आवाजी मतदानाने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ आहे, तर काँग्रेस आणि जेडीएसकडे १०० आमदारांचे संख्याबळ आहे. आवाजी मतदानाच्या जोरावर येडियुरप्पांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. तत्पूर्वी, येडियुरप्पांनी सभागृहात विश्‍वासदर्शक ठराव मांडताना, प्रशासन अपयशी ठरले आहे. आम्ही कारभार सुस्थितीत आणू. आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही. आपण एकत्रित मिळून काम करू. माझ्यावर विश्‍वास ठेवा, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.  

दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी विश्‍वासदर्शक प्रस्तावाला विरोध करताना मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले येडियुरप्पा सरकार कसे टिकवणार, असा सवाल केला. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker