बँक ऑफ बडोदा गणोरी शाखे समोर युवकांचे कर्जासाठी अन्नत्याग उपोषण, वर्षभरापासून कर्ज देण्यास बँक मॅनेजरची टोलवाटोलवी.

Foto

फुलंब्री- तालुक्यातील गणोरी येथील बँक ऑफ बडोदा बँकेकडून परिसरातील युवकांना दोन वर्षांपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत गरजू नागरिकांना कर्ज उपलब्ध होत नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या मुलांना मुद्रा लोन आणि गरजूंना गृह कर्ज मिळत नसल्याने येथील तरुण मुले व गावातील नागरिकांनी अन्न त्याग उपोषण मंगळवार (दि. ८) सुरू केले आहे. गावात बडोदा बँकेची ब्रँच आल्यापासून उपोषण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

उपोषण करण्यापूर्वी बँकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावात बँक ऑफ बडोदा बँकेची शाखा आहे. गावात छोटे मोठे उधोग धंदे उभारले जात आहेत. ऑटो गॅरेज, वर्क शॉप सह कृषी दुकाने, कपड्याची दुकाने आहेत. परंतु यासह आदी उधोगला चालना देण्यासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नाही. शिवाय सरकारच्या मुद्रा लोन, गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा युवकांना लाभ मिळत नाही. त्यामुळे व्यवसाय उभारण्याच्या इच्छा अपेक्षा मनात बाळगणाऱ्या युवकांना आर्थिक मदत होत नाही. त्यामुळे गावात असलेली बँक कूच कमी ठरत आहे. 

बँक ऑफ बडोदा गणोरी शाखेत मुद्रा लोण, आण्णासाहे पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अंतर्गत येणारे अर्ज शाखेत पडून आहे. शासनाच्या विविध योजनेअंतर्गत कर्ज देण्याचे निर्देश आहेत. परंतु गणोरी बँकेत योग्य लाभार्थी निवडून त्यांच्या फायलींचा विचार होत नाही. त्यामुळे अनेक महिन्यापासून कर्जाची मागणी करत असलेल्या नागरिकांना कर्ज उपलब्ध नाही. शिवाय उपोषणाचा इशारा देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. उलट उपोषणकर्त्यांना मोठी नियम व अटी शर्तीचे पत्र पोस्टाने देऊन उपोषण कर्त्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रकार झाला आहे.

 

या वेळी सुदाम गायकवाड, संतोष पवार, कृष्णा भादवे, बाबासाहेब सावंत, किशोर तांदळे, रावसाहेब खिल्लारे, प्रकाश उबाळे,जीवन गायकवाड, विठ्ठल जाधव, महादेव पांचाळ, कैलास तांदळे, अंबादास जाधव, राजू उबाळे यांच्यासह गणोरी येथील युवक नागरिक छोटे - मोठे व्यावसायिक, प्रहार जनशक्ती पक्षाचे काही कार्यकर्ते अन्न त्याग उपोषणाला बसले आहेत.

 

वर्षभरापासून नुसती आश्वासने


येथील बँक मॅनेजर योगेश जाधव हे संबंधित गरजू खातेदाराला कर्ज न देता नुसती टोलवाटोलवी करतात. मागील वर्षभरापासून आणसाहेब पाटील आर्थिक मागास  विकास मंडळ अंतर्गत कर्ज देण्याचे आश्वासन देत आले परंतु अद्याप कर्ज दिलेले नाही.