‘दबंग ३’ पुढील वर्षी येणार, अरबाज खानचा औरंगाबादेत खुलासा; मराठी फिल्म करण्याचीही इच्छा

Foto

औरंगाबाद – सलमान खानची सुपरहिट फिल्म दबंग आणि दबंग २ नंतर आता दबंग ३ पुढच्यावर्षी येणार आहे. याची माहिती स्वतः दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खान याने औरंगाबादेत दिली आहे.

एमआर ग्रुपच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अरबाज खान मंगळवारी औरंगाबादला आला होता. यावेळी हैदराबादी अभिनेता अदनान साजिद खानही उपस्थित होता.  औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे, याआधी एक-दोन वेळेस येथे आलो पण हे शहर पाहायचे राहून गेले आहे. औरंगाबाद  पाहाण्याची खूप इच्छा असल्याचे अरबाजने यावेळी सांगितले. सलमानची मुख्य भूमिका असलेल्या दबंगच्या यशानंतर अरबाजने दबंग २ ही फिल्मही बनवली होती. आता दबंग ३ बनवण्याची इच्छा असल्याचे सांगत, पुढील वर्षी ही फिल्म रिलिज होईल याचा खुलासा अरबाजने केला. 

 

अशी असेल 'दबंग ३'ची कथा

'दबंग ३' मध्ये चुलबुल पांडेच्या भूमिकेत सहाजिकच सलमान खान असणार आहे. या फिल्ममध्ये चुलबुल पांडेचा भूतकाळ दाखवला जाणार आहे. चुलबुल पांडेची पर्सनॅलिटी अशी का आहे, हे दाखवले जाणार आहे. ही फिल्म फ्लॅशबॅक सारखी असणार आहे. त्यासोबतच यात हेही दाखवले जाणार आहे की चुलबुल पांडे आता पुढे काय करणार.

चांगली कथा मिळाली तर मराठी फिल्मही करणार

रिजनल फिल्म्सला सध्या चांगले दिवस आले असल्याचे अरबाज खान म्हणाला. तो म्हणाला, बॉलिवूडची प्रत्येक फिल्म हिट होईलच असे होत नाही. ठग्स ऑफ हिंदूस्थानचे नाव न घेता तो म्हणाला की, मोठमोठे कलाकार आणि बिग बजेट असलेले चित्रपटही फ्लॉप होतात. त्याचवेळी फारशे कोणाला माहित नसलेले आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे सध्या हिट होत आहेत. मराठीमध्ये अनेक चांगले चित्रपट येत आहेत. माझ्याकडेही एखादी चांगली कथा आली तर मराठी चित्रपट करण्यास आवडेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अरबाज म्हणाला.

 

दबंगचा कॅमरामॅन मराठी

अरबाज म्हणाला, दबंगचा आमचा कॅमरामॅन महेश लिमये हा मराठी आहे. त्याने मराठीमध्येही भरपूर काम केले आहे. महेशनेही मला काही चित्रपट ऑफर केले होते. चांगली कथा असेल तर मराठी चित्रपट निर्मिती करण्यास आवडेल, असे तो म्हणाला. 


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker