युती झाल्याने खुश, जागा न सोडल्याने नाखूष ; आरपीआयला दक्षिण मुंबई किंवा ईशान्य मुंबईची जागा सोडावी ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Foto
भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने  खुश आहे.मात्र आरपीआय ला एकही जागा न सोडल्याने मी नाखूश आहे. युतीची बोलणी सुरू असताना मला मुख्यमंत्र्यांनी फोन केला नाही. अशी नाराजी व्यक्त करीत मला एक तरी  जागा द्या. दक्षिण मुंबई नाही तर ईशान्य मुंबई सुद्धा चालेल  अशी जाहीर मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे गुरुवारी (२१ फेब्रुबारी) आयोजित पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना आणि भाजप यांच्यात  अडखळत का होईना लोकसभेसाठी शेवटी युती झालीच. शिवसेनेला २३ जागा आणि भाजप २५ जागा असा  २३-२५ चा फॉर्म्युला ठरला मात्र या जागा वाटपात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) यांना एकही जागा न सोडल्याने आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनि  आयोजित पत्रकार परिषदेत मला लोकसभेत जायची इच्छा आहे. युती झाल्याने खुश आहे मात्र जागा सोडल्याने मी नाखूष आहे. असे वक्तव्य करीत नाराज असल्याचे संकेत दिले. मला एक तरी जागा सोडावी दक्षिण मुंबई नाही तर ईशान्य मुंबई सुद्धा चालेल अशी मागणी केली.

पत्रकार परिषद दरम्यान आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्रमोदी आणि भाजप सरकारवर स्तुतीसुमने उधळत मोदींचे काम मोठे आहे.  ते दलित समाजासाठी कार्य करत आहेत.  काही विचारवंत व्हाट्सएप वर मोदींना बदनाम करीत आहे. मोदींना कोणीही हरवू शकत नाही.कमळ अजून पाच वर्षे फुलणार कोमेजणारे कमळ नाही असे मत व्यक्त केलेया वेळी परिषदेला महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम ,मिलिंद शेळके ,दौलत खरात ,नागराज गायकवाड ,अरविंद अवसरमल ,बाळकृष्ण इंगळे, किशोर थोरात ,सतिश गायकवाड ,नितीन वाकेकर,  इत्यादी उपस्थित होते

भाजपच्या चिन्हावर लढणार नाही.

आठवले आरपीआय साठी लोकसभेची एक जागा मागत आहेत.याच विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रशनाचे उत्तर देताना मी काँग्रेस मध्ये असतानाही काँग्रेस च्या चिन्हावर निवडणूक लढविली नाही. भाजपने मला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची ऑफर दिली तरी मी लढणार नाही.भाजपच्या चिन्हावर लढलो तर माझा पराजय होईल. अशी प्रतिक्रिया अठवलेनि दिली.

आरपीआयचा सन्मान केला पाहिजे.

 २०१४ च्या निवडणुकीत भाजप ला मोठ्या प्रमाणात दलित समाजाची मते मिळाली आहे. ती मते आरपीआयमुळे मिळाली.मी ज्या पक्षासोबत युती करतो त्या पक्षाला दलित समाज मोठ्या प्रमाणात मतदान करतो. आरपीआयला बाजूला सारून चालणार नाही. मित्रपक्ष म्हणून युतीत सन्मान मिळाला पाहिजे.