डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है ! - आ. हर्षवर्धन जाधव

Foto

औरंगाबाद- कन्नड विधानसभा मतदार संघाची ओळखच जाधव परिवार आहे. त्यामुळे साहजिकच या मतदार संघात त्यांचे वर्चस्व असणार यात शंकाच नाही. त्यामुळे कन्नड चे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांना शह देण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कंबर कसली आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले उदयसिंह राजपूत यांची घरवापसी ही देखील याचाच भाग आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावर आमदार जाधव यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. जाधव म्हणाले की, डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है ! 

 

उदयसिंह राजपूत यांच्या घरवापसीने कन्नड तालुक्यात शिवसेना पुन्हा आपली पकड मजबूत करत असून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना शह देण्यासाठीच खासदार चंद्रकांत खैरे यांची ही खेळी असल्याचे सध्या बोलले जात आहे. यावर सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना आमदार जाधव यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. जाधव म्हणतात की कन्नडचा डॉन आहे आणि 'डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है', जाधव पुढे बोलताना म्हणाले की उदयसिंह राजपुतांच्या यांच्या प्रवेशाने मला कसलाच फरक पडत नाही. उदयसिंह यांच्याच काय मला अख्या शिवसेनेनेच फरक पडत नाही. यांना मी काहीच समजत नाही, मला घेरण्यासाठी खैरेच नाही तर अनेक जन हात धुवून आहेत पण यांना माहित नसेल की डॉन का इंतजार ग्यारह मुलको की पुलिस कर रही है, त्यामुळे डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है, तुम्ही डॉनच्या नादाला लागू नका असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे.