बहुप्रतिक्षित नाळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Foto


फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अफाट यशानंतर नागराज मंजुळे निर्मित आणि सुधाकर रेड्डी यंक्कटी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित नाळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, सेवा चव्हाण, ओम भूतकर, श्रीनिवास पोकळे आदी कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.

 

दिग्दर्शक म्हणून लौकीकास आलेले नागराज मंजुळे यांनी स्वत: या चित्रपटात अभिनय केलेला आहे. चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून होती. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता संपणार आहे.

 

सैराट या चित्रपटाने १०० कोटींचा व्यवसाय केल्यानंतर आता नाळ चित्रपटाला प्रेक्षक किती पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker