चित्रपट निर्माती प्रेरणा अरोराला अटक

Foto

मुंबई- टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’, केदारनाथ यांसारख्या चित्रपटांची निर्माती प्रेरणा अरोराला आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. पद्मा फिल्म्सच्या अनिल गुप्ता यांनी प्रेरणाने १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रेरणाला अटक झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

प्रेरणाची अरोराची कारकीर्द वादग्रस्तच

केदारनाथ’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रेरणा सांभाळत होती. परंतु दिग्दर्शक अभिषेक कपूरनेही तिच्यावर पैसे थकविल्याचा आरोप केला होता.

 

जॉन अब्राहमच्या जेए एंटरटेन्मेंटनंही प्रेरणा अरोराच्या क्रिअर्ज एंटरटेन्मेंट विरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे.

 

एकपेक्षा अधिक पासपोर्ट आणि पॅन कार्ड बाळगल्याप्रकरणी प्रेरणाला अटक झाली होती.

 

मसाज करणाऱ्या महिलेला तिचा मोबदला दिला नसल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता. शिवीगाळ करत हात उगारल्याची तक्रार संबंधित महिलेने दाखल केली होती. असे अनेक आरोप निर्माती प्रेरणावर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेरणा अरोराची कारकीर्द वादग्रस्तच राहीली आहे.

 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker