कृषि विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ घालणारे

Foto
विरोधी पक्षाचे 8 खासदार निलंबित
राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांचे एक आठवड्यासाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. दरम्यान, विरोधकांनी राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला होता, जो सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटळला.
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. रविवारी कृषि विषयक विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या आणि धक्काबुक्की करणार्‍या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केलीय. यानंतर सभागृहाचे कामकाज 10.00 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. 10 वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पुन्हा खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज 10.36 पर्यंत स्थगित करण्यात आले. 10.00 वाजता उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपसभापतींना त्यांना सदनाच्या बाहेर जाण्यास सांगितले मात्र त्यांनी यास नकार दिला.
याच गोंधळादरम्यान शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सुधारणा) विधेयक, 2020 चर्चेसाठी सदनात सादर केलं. परंतु, गोंधळ वाढलेला पाहता उपसभापतींना सदनाचे कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. कृषि विषयक विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडून यांनी नाराजी व्यक्त करत या घटनेची निंदा केली. उपसभापती हरिवंश यांच्यासमोर गैरवर्तन केल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना एका आठवड्यासाठी सदनाच्या कामकाजातून निलंबित केलेय. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे. मात्र, सभापतींनी विरोधकांकडून दाखल करण्यात आलेला उपसभापतींविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावलाय. दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार के सी वेणुगोपाळ यांनी ’कर्ज देण्यास बँकांचा नकार’ या मुद्यावर राज्यसभेत शून्यकाळात नोटीस दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयकांवर चर्चा आणि मतदान सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विधेयकं संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी राज्यसभेचं कामकाजाची वेळ वाढवली. यावर, उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. 
खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला. ’विधेयकांवर चर्चा सरकारला नकोय. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयके मंजूर करायची आहेत. ही विधेयकं आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणे गरजेचे होते. करोनाच्या नावावर अध्यादेश काढले गेले. सरकारने भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेलं नाही’ असा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला. या गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विषयक दोन विधेयके मंजूर करण्यात आली.
निलंबित केलेले खासदार
8 संजय सिंह (आम आदमी पक्ष)
8 राजीव सातव (काँग्रेस) 
8 डेरेक ओ ब्रायन (तृणमूल काँग्रेस)
8 के के रगेश (माकप), 
8 सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस) 
8 रिपुन बोरा (काँग्रेस) 
8 डोला सेन (तृणमूल काँग्रेस)
8 एलामराम करीम (माकप) 
या खासदारांना निलंबित केले आहे. उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker