अभिमान वाटेल अशी कामगिरी करू

Foto
लष्करप्रमुख जनरल नरवणे यांंचे वक्‍तव्य
पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्‍यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्याबाबत चीनच्या ताज्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, लडाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा र्सवकष आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी आमचे अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु असे सांगत चर्चेच्या माध्यमातून वाद मिटेल असा विश्वास एएनआयशी बोलताना व्यक्त केला. 
लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचे मनोबल उंचावलेले असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत. नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैन्य तैनात करण्यात आले आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचे रक्षण होईल, असेही ते म्हणाले आहेत. जवानांना मनौधैर्य उंचावलेले आहे. आपले जवान त्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker