आंध्र प्रदेशात कोविड सेंटरला भीषण आग

Foto
दहा जणांचा होरपळून मृत्यू
 प्रदेशमधील विजयवाडा येथील कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत गुदमरुन मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 10 वर पोहोचला आहे, तर 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर काम करीत ही आग विझवली. आज (रविवार) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे कळते.
आग लागली त्यावेळी स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये 30 रुग्ण आणि 10 वैद्यकीय कर्चचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे इथल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, 17 रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचार्‍यांनी जीव वाचवण्यासाठी दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफच्या कर्मचार्‍यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. 
कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. प्राथमिक चौकशीतून शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचे कळते. मात्र, याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या आग लागलेले हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सुमारे 22 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते.दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबाबत ऐकून धक्का बसल्याचे म्हटले आहे. तसेच यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांप्रती दुःख व्यक्त करीत आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकार्‍यांना बचाव कार्य राबवण्याबरोबरच जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker