रुग्णांच्या संख्येत घट, तर रिकव्हरी रेट वाढला

Foto
देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्या 42 लाख 80 हजार 423 झाली आहे. असे असले तरी आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज एका दिवसात 75 हजार 809 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सतत 90 हजारहून अधिक रुग्ण सापडत असताना आजची आकडेवारी दिलासा देणारी आहे. तर, आज 1133 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 72 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 74 हजार 123 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, एकूण निरोगी रुग्णांची संख्या 33 लाख 23 हजार 951 आहे. तर, देशात 8 लाख 83 हजार 697 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker