काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या 15 पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली. शिवकुमार यांच्यावरील एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयने धाडी टाकल्या. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली. कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे.