राज्यापाठोपाठ जिल्ह्यात कोरानाचा उद्रेक
देशात एकूण 45,62,414 रुग्ण स राज्य 10 लाखांच्या उंबरठ्यावर
जिल्ह्यात एकूण 27 हजार 289 रुग्ण
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने देशाची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. आज एकाच दिवसात देशात 96 हजार 551 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजपर्यंत देशात 45 लाख 62 हजार 414 रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रात 9 लाख 90 हजार 795 तर औरंगाबाद जिल्ह्यात 27 हजार 289 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या आलेखाने सरकार चिंतेत पडले आहे. संसर्ग टाळण्यासाठी आता नागरिकांनीच दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.
कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात दुसरीकडे नागरिकांचा वावर देखील वाढत चालला आहे. 1 ऑगस्ट पासून प्रतिदिन येणारा आजपर्यंत एकूण 41 दिवसांचा कोरोनाचा अहवाल पाहिला तर आजपर्यंत 14 दिवसांत प्रतिदिन 200 पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली आहे. तर 20 दिवसांत प्रतिदिन 300 हुन अधिक रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आज जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा 27 हजार पार गेला आहे. त्यात 1 तारखेपासून आजपर्यंत कोरोनाच्या अहवालानुसार सलग 14 दिवसांत दररोज 200 हुन अधिक रुग्ण वाढले आहेत. तर 20 दिवसांत दररोज 300 हुन अधिक रुग्ण वाढले आहेत. तर 6 दिवसांत तर कोरोना रुग्णांची संख्या ही प्रतिदिन 400 हुन अधिक वाढली आहेत. 1 ऑगस्ट पासून केवळ एकाच दिवशी 17 ऑगस्ट रोजी शंभर च्या आत 64 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णांचा आलेख प्रतिदिन वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
*या वीस दिवसांत वाढले प्रतिदिन तीनशेहुन अधिक रुग्ण*
1 ऑगस्टपासून आज सकाळपर्यतच्या अहवालानुसार वीस दिवसांत दररोज तीनशेहून अधिक रुग्ण वाढले आहेत. त्यात 3 आणि 5 ऑगस्ट ला 341, 7 तारखेला 339, 8 ला 377, 12 ला 328, 13 ला 335, 15 ला 306, 20 ला 327, 21 ला 310, 22 ला 329, 24 ला 344, 25 ला 321, 26 ला 367, 28 ला 364, 29 ला 362, 31 ऑगस्ट ला 310 तर सप्टेंबर महिन्यात 2 तारखेला 320, 5 ला 342, 6 ला 310, 9 तारखेला 387 असे एकूण वीस दिवसांत प्रतिदिन 300 पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.
14 दिवसांत प्रतिदिन 200 पेक्षा अधिक रुग्ण
1 ऑगस्ट ते आज पर्यत चौदा दिवसांत प्रतिदिन दोनशे पेक्षा अधिक कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यात 1 ऑगस्ट रोजी 204 रुग्ण वाढले. तर 2 ला 226, 4 ला 256, 6 ला 283, 9 ला 263, 10 ला 297, 11 ला 254, 14 ला 292, 16 ला 224, 18 ला 299, 19 ला 255, 23 ला 288, 30 ऑगस्ट ला 239 रुग्ण वाढले. तर सप्टेंबर महिन्यात 1 तारखेला 234 रुग्ण वाढले.
6 दिवसांत प्रतिदिन 400 पेक्षा अधिक रुग्ण
1 ऑगस्ट पासून आज सकाळपर्यत कोरोनाच्या अहवालानुसार सहा दिवसांत प्रतिदिन 400 हुन अधिक रुग्ण वाढत आहेत. त्यात 27 ऑगस्ट ला एकाच दिवशी 426 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. तर सप्टेंबर महिन्यात 3 तारखेला 466 तर 4 तारखेला 409 रुग्ण एकाच दिवशी आढळून आले. तसेच काल 10 सप्टेंबर ला 437 रुग्णांची भर पडली.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 9,90,795 वर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही 9 लाख 90 हजार 795 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यंत 7 लाख 715 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 28 हजार 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 2 लाख 61 हजार 798 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 45 लाखाच्या पुढे
जगभरात थैमान घालणार्या करोना महामारीचा देशातील विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 45 लाखांच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या 76 हजार 271 इतकी झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या सहा राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सर्वात आधिक आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी 50 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या सहा राज्यात आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत एक हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत देशात 96 हजार 551 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 45 लाख 62 हजार 415 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 35 लाख 42 हजार 664 जणांनी करोनावर मात केली आहे. भारतातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर देशांपेक्षा चांगले आहे. देशात सध्या 9 लाख 43 हजार 480 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात करोना चाचण्या वाढल्यामुळे रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत 11 कोटी 63 लाख 543 करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पाच 11 लाख 63 हजार 542 करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र रुग्णसंख्येत 1 नंबरवर
महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमुळे देशाच्या चिंतेत भर पडलीय. महाराष्ट्रात दररोज रुग्णांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक भर पडताना दिसतेय. रुग्णसंख्येत क्रमांक 1 वर असलेल्या महाराष्ट्राने अद्याप आपले यादीतले स्थान कायम राखले आहे. महाराष्ट्रात सध्या 2 लाख 53 हजार 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 27 हजार 787 जणांचा मृत्यू झालाय. दिलासादायक म्हणजे तब्बल 6 लाख 86 हजार 462 रुग्णांनी करोनावर मात केलीय.