परभणी जिल्ह्यातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना भाजपने हाकलले

Foto
औरंगाबाद :  सीएएच्या विरोधात आलेल्या ठरावाला विरोध न करता या ठरावाला मंजुरी देऊन पक्षादेशाचे उल्‍लंघन केल्याचा ठपका ठेवून परभणी जिल्ह्यातील सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालमचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.
भारताच्या काही शेजारी राष्ट्रांतील पीडित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याच्या व देशातील घुसखोरांना बाहेर काढण्याच्या उद्देशानं भाजप सरकारनं नुकताच नागरिकत्व सुधारणा कायदा केला आहे. सअसे असतानाही परभणी जिल्ह्यातील पालम व सेलू नगरपरिषदेत सीएएच्या विरोधात ठराव आणण्यात आला. पालम नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष असलेले भाजपचे बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगरपरिषदेत नगराध्यक्ष असलेले विनोद हरीभाऊ बोराडे यांनी त्यास आक्षेप घेतला नाही. उलट या ठरावाला मंजुरी दिली. त्यांच्या या भूमिकेची गंभीर दखल घेऊन पक्षानं त्यांच्यावर तातडीनं हकालपट्टीची कारवाई केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोकडे व बोराडे यांच्या हकालपट्टीचे पत्रक जारी केले आहे. ’सीएएच्या विरोधात प्रस्ताव आणून रोकडे व बोराडे यांनी पक्षविरोधी कृत्य केले आहे. ही कृती शिस्तभंग करणारी असल्यानं त्यांना पक्षातून काढण्यात येत आहे,’ असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker