औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे व माजी नगरसेवक तथा भाजपचेे शहर चिटणीस दामूअण्णा शिंदे, बाळू नाना शिंदे व विष्णू पुंगळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल मुंबई येथील शिवसेना कार्यालयात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे व आमदार संजय पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, नगरसेवक मनोज गांगवे, सदाशिव पप्पूलवाड, विभागप्रमुख रवि गायकवाड, महादेव कोल्हे, जयभवानीनगर येथील गणेश कुरे, उद्धव चौधरी, कृष्णा गोडसे, शंकर वाघमारे, तुकाराम तौर, मच्छिंद्र कुबेर, बंटी बोर्डे, अमोल मोरे, शिवराज शिंदे, अमित मुंडे, शुभम देहाडराय, आदित्य पळसगाव, दीप निर्मळ, साई तुपे, तीर्थराज आहेर, गौरव देसले, कुशल बावसिवाल, शिवा गावडे, संकेत मोरे, संकेत कसबेकर, हर्ष बडगुजर, स्वप्निल डिडोरे, गोपाळ घुगे, आशिष वीर, स्वराज चोरगे, शाखाप्रमुख प्रशांत देशमुख, इंद्रजीत जायभाय, महामुनी, ज्ञानेश्वर सुलताने, भागवत भारती, श्यामसिंग राजपूत, शिवाजी चौरे, आकाश पोळ, मंचक निर्मळ यांची उपस्थिती होती.