जालन्यातून खोतकरांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसकडून चाचपणी

Foto
जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामधून सध्या विस्तावदेखील जात नाहीये. याचाच फायदा घेत कॉग्रेस एक महत्वपूर्ण बैठक घेणार असून या बैठकीत खोतकर यांना उमेदवारी देण्यासंबंधी निर्णय होणार आहे. 

शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी शड्डू ठोकला होता. मात्र, युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकर यांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली. जालण्याची जागा भाजपाला सुटणार असल्याने युतीतर्फे याठिकाणी दानवे निवडणूक लढवतील. मात्र, युती झाल्यानांतरही खोतकर दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी ऑफर केली जाण्याची शक्यता आहे. यासंबंधी काँग्रेसची एक बैठक होणार असून त्यामध्ये यासंबंधी निर्णय घेतला जाईल. 

आता, काँग्रेसने दिलेली ऑफर खोतकर स्वीकारतात का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

  

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker