भारतात कोरोनाचा उद्रेक

Foto
24 तासांत 78 हजार 761 नव्या रुग्णांची नोंद
 जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक देशात वाढतच चालाला आहे. सलग चौथ्या दिवशी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत 75 हजारांहून अधिक वाढ झाली असून गेल्या 24 तासांमध्ये 78 हजार 761 नव्या रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्याआधीच्या तीन दिवसांमध्ये अनुक्रमे 76 हजार 472, 75 हजार 760 आणि 77 हजार 266 रुग्णांची भर पडली होती. 7 ते 23 ऑगस्ट या काळात रुग्णांची संख्या 10 लाखांनी वाढली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 35 लाख 42 हजार 734 इतकी झाली आहे. यापैकी सात लाख 65 हजार 302 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत 27 लाख 13 हजार 934 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशातील करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 76 टक्केंपेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासांत देशात 948 जणांचा करोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी 16,867 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकणू रुग्णांची संख्या 7,64,281 इतकी झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातीव एकूण करोनााबळींची संख्या 63 हजार 498 इतकी झाली आहे.देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळेच रुग्णांची संख्याही वाढत आहे. आयसीएमआरच्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 61 हजार 636 करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker