डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण

Foto
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्‍वारंटाईन केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्‍वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. होपला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवालसमोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे. होप हिक्सला कोरोनाची बाधा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते. होप हिक्स कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले. अतिशय मेहनतीने काम करणार्‍या होप हिक्सला कोरोनाची लागण होणे हे धक्कादायक आहे. मेलेनिया आणि मी कोरोना चाचणी केली असून अहवालाची प्रतिक्षा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. होप हिक्स या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नियमितपणे प्रवास करतात. होप हिक्स व अन्य काही अधिकारी क्लीवलँड, ओहियो येथे निवडणुकीच्या कामासाठी गेले होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker