जालन्यात औताडे देणार दानवेंना कडवी झुंज; केवळ रस्ते केल्याने शहराचा विकास होत नाही, औताडे यांची टीका

Foto
जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट मिळालेले विलास औताडे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना कडवी झुंज देण्याची तयारीत आहे. मागील २० वर्षांपासून  रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार आहेत. त्यामानाने जालना मतदारसंघाचा विकास झालेला नाही. त्यामुळे दानवे यांच्यावर मतदारसंघातील जनता नाराज आहे. मात्र,काँग्रेसकडून सक्षम उमेदवार भेटत नसल्याने जनता दानवे यांना सातत्यानेदानवे यांना निवडून देत आहे.  यावेळी मात्र, काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी कंबर कसली असून दानवे यांना पराभवाची धूळ चारण्यास ते उत्सुक आहेत.
 
     २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत दानवे मोठ्या फरकाने  विजयी झाले होते. याआधी झालेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आ. कल्याण काळे यांचा केवळ ८००० मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी २०१४ प्रमाणे मोदी लाट नसल्याने दानवे यांना हि निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने दानवे यांनी जिल्हातील राजकारणावर वर्चस्व निर्माण केले. त्याचप्रमाणे युतीतील घटकपक्ष शिवसेनबरोबर देखील त्यांच्या कुरबुरी सुरु होत्या. यामुळेच खोतकर यांनी दानवेंविरुद्ध दंड थापटले होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीधर्माची आठवण करून दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली. 

  यांनतर काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या विलास औताडे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून संपूर्ण ताकदीनिशी दानवे यांच्याविधात मैदानात उतरणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्याचे प्रश्न बिकट बनले आहेत, बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, नोटबंदी आणि जीएसटीने ग्रामीण अर्थव्यस्था कोलमडून पडली असून यामुळे अनेक जण बेरोजगार झाले, केवळ रस्ते केल्याने शहराचा विकास होत नाही अशी टिका औताडे यांनी केली आहे.  लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून खा. रावसाहेब दानवे यांचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे औताडे यांनी म्हटले आहे.  यावरून  दानवे  विरुद्ध औताडे असा चुरशीचा सामना मतदारांना पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker