दलित मतदारांना आकर्षित करण्यात एमआयएम ची दमछाक.

Foto

औरंगाबाद: ऍड.प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला दलित मुस्लिम मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र लोकसभेचे उमेदवार आ.इम्तियाज जलील यांच्यावर दलित कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा कालच्या सभेत ऐकायला मिळाली. यामुळे दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी एमआयएम ला मोठी दमछाक करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

 दलित आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली. दोन्ही समाजाने बहुसंख्येने वंचित आघाडीला आत्मसात केले आहे. मात्र, शाहनुरवाडी येथील प्रचारादरम्यान एमआयएम चे अध्यक्ष ओवैसी यांनी बुद्धांना अभिवादन करण्याचे टाळल्या नंतर शहरातील दलित समाजाचे कार्यकर्त्यांमध्ये मध्ये एमआयएम बाबत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर किराडपुरा भागात गुरुवारी झालेल्या सभेत दलित कार्यकर्त्यांची देखील वानवा होती. आणि एमआयएम पक्षात निवडून आलेले नगरसेवकांची देखील अनुपस्थिती काही वेगळच सांगून जात होती. शुक्रवारी जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली.  यावेळी आम्ही एमआयएम साठी नव्हे तर प्रकाश आंबेडकरासाठी सभेला आल्याचे अनेक कार्यकर्ते सांगत होते. दलित कार्यकर्ता मध्ये अशा अनेक नाराजीच्या चर्चा रंगात होत्या.  

एकंदरीत परिस्तिथी पाहता एड.आंबेडकरांच्या पाठीमागे मोठा जनसमुदाय असल्याचे कळते. मात्र, इम्तियाज जलील आणि एमआयएम वर दलित कार्यकर्ते चा मोठा गट नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एमआयएमची दमछाक होत असल्याचे दिसत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker