केवळ सीमांत फेरफार. पदाधिकऱ्यांचा आशेवर पाणी .......

Foto

औरंगाबाद:-मनपा निवडणुकीकरिता करण्यात आलेल्या वॉर्ड रचना व आरक्षण सोडतीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. यावर तब्बल ३७० आक्षेप दाखल करण्यात आले होते. या सर्व आक्षेपांची सुनावणी शनिवारी घेण्यात आली. यानंतर मनपाचे काही अधिकारी पुन्हा फिल्डवर उतरले आहेत. यावेळी  नव्याने केलेल्या रचनेतील काही वॉर्डच्या सीमांत बदल होणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली. या मुळे मोठे बद्दल होण्याची आस लावून बसलेल्या पदाधिकऱ्यांचा आशेवर पाणी फेरले.  


स्थानिक सत्तेचे केंद्र असलेल्या मनपाच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एप्रिलमध्ये या  निवडणुका होतील. याकरिता प्रशासनाने ११५ वॉर्डची  रचना तयार केली. यानंतर आरक्षण सोडत घेण्यात आली. 
पुढे यावर टीकांचा अक्षरशः पाऊस पडला.  भ्रष्टाचार झाल्याचे आरोपही झाले.  यामुळे वॉर्ड रचनेवर  आठ दिवसात मनपात सत्तेत असलेल्या पक्षाच्या उपमहापौर, सभागृह नेता, प्रभाग सभापती आदींसह इतर तब्बल ३७० जनांनी  आक्षेप नोंदविले. शनिवारी या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली. यानंतर मनपातील  अधिकारी  दुसऱ्याच दिवशी फिल्डवर उतरले आहे. वॉर्ड रचना करताना काही वॉर्डांत नैसर्गिक सीमां ओलांडण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर आक्षेप दाखल झाल्याने यात बदल होण्याची नगरसेवकांना आशा होती. परंतु यात फार काही बदल होणार नसल्याचे स्पष्ट होत असून, काही वॉर्डांच्या सीमात केवळ बदल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. विशेष म्हणजे हे बदल करताना आरक्षणाला कुठलाच धक्का लागू दिला जाणार नसल्याचे समजते 

जेथे नैसर्गिक हद्दिना बगल तेथेच बदल.....  

यावेळी ज्या वॉर्डांत नदी, नाले, डीपी रोड आदी नैसर्गिक हद्दी ओलांडून वॉर्ड रचना करण्यात आली. अशा काही वॉर्डच्या सीमांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. याकरिता मनपाचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, वॉर्ड अधिकारी कामाला लागले आहेत. याकरिता प्रत्यक्ष पाहणी व गुगल मॅपिंगचा सहाराही घेतला जात आहे. 


....... या तर जाणून बुजून केलेल्या चुका

काही वॉर्डमध्ये नैसर्गिक हद्दी ओलांडून वॉर्ड जोडण्यात आले. कुठे ई.बी मध्ये देखील बदल करण्यात आला. रचना करताना या चुका जाणून बुजून करण्यात आल्या असल्याची चर्चा आजी- माजी पदाधिकाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. या जाणून बुजून केलेल्या चुका मध्येच बदल केले जाण्याची शक्यता आहे. 



सातारा देवळाई संबंधी ऑन द  स्पॉट चर्चा 

सर्वाधिक आक्षेप  सातारा- देवळाई संबंधी दाखल झाले होते. रात्री नऊ वाजेनंतर यासंबंधी आलेल्या एका आक्षेपावर सुनावणी झाली. यानंतर सातारा - देवळाई येथील वॉर्ड हद्दी संबंधी  मनपा अधिकारी व आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्ये ऑन द  स्पॉट चर्चा झाल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker