नवी दिल्ली : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘आरआरआर’ने इतिहास रचला आहे.
काय आहे पुरस्काराचे महत्व ?
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखले जातो. यंदाचा ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आता ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.