अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहह्याक पोलीस निरीक्षक अनिल परजने यांनी राहत्याघरी सर्व्हिस रिव्हलवर ने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परजने हे मूळचे बीड जिल्ह्यातील खलापुरी या गावातील रहिवाशी होते. दोन वर्षांपूर्वी ते औरंगाबाद शहरातील वाळूज पोलीस ठाण्यात कार्यरत होते.त्यांची बदली औरंगाबाद येथून अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठण्यात झाली होती. आज सकाळी अचानक त्यांनी त्यांच्या रिव्हलवर ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण समोर आले नाही .या दुर्दैवी घटनेबाबत माहिती मिळताच औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यसह वरिष्ठ अधिकारी गोंदीकडे रवाना झाले आहे. परजने यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या मुळगावतील मित्र व नातीवाईकांनी गोंदी येथे मोठी गर्दी केली
आज संपूर्ण गाव हळहळला
अनिल परजणे हे बीड जिल्ह्यातील खलापुरी गावाचे होते. त्यांच्यामुळे गावात आज दीडशे पोलीस कर्मचारी आहेत. काही वर्षापूर्वी गावात क्रिकेट वरून दोन तरुणांच्या गटात वादावादी झाली.मारामारी झाली त्यावेळी अनिल परजणे गावात होते. गावात ५० मुलं संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत क्रिकेट खेळायची. परजने क्रिकेटच्या ग्राउंड वर पोहोचले. स्टम्प बॅट याची होळी केली. तरुणांना पोलीस कसं होता येईल याचं मार्गदर्शन केलं. स्वतःच्या पैशातून पोलीस भरतीच्या सरावासाठी लागणारे साहित्य विकत घेतलं . सिंगलबार, डबलबार उभा केला, लांब उडी कशी घ्यायची याची प्रॅक्टिस ते तरुणांना करून द्यायचे. गावातील खरपाडे नावाच्या एका शिक्षकानं पोलिस भरतीमध्ये परीक्षेला कसं समोर जावं यासाठी जनरल नॉलेज आणि अंकगणिताचा सराव घेतला . ज्या ग्राउंडवर पूर्वी दोन-दोन तास टगेगिरी करत पोर क्रिकेट खेळायची त्याच ठिकाणी गावातली २५ तरुण हे पोलीस भरतीचा व्यायाम करू लागली. आणि ६ वर्षांपूर्वी गावात एकाच वेळी मुंबई आणि इतर भागात पंधरा मुले पोलिसात भरती झाली .गावातल्या तरुणांचा विश्वास वाढला .आजही गावात रोज मुलं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात. राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गेल्या सहा वर्षात दीडशेपेक्षा अधिक पोलीस शिपाई तयार करण्याचं काम केलं. गोरगरिबांच्या मुलांमध्ये पोलिसात भरती होण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारा पोलिसातील माणूस गावातल्या लोकांनी पाहिला आज संपूर्ण गाव हळहळला स्वतः अत्यंत संवेदनशील असलेल्या अनिल यांनी का गोळी मारून घेतली हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे...